(फोटो सौजन्य: Instagram)
गाणी ऐकायला कुणाला आवडत नाही. मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहेत. अनेकदा मूड रिफ्रेश करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी गाणी ऐकली जातात. त्यातही लोकांमध्ये भोजपुरी गाणयाचे क्रेझ जास्तीच लोकप्रिय आहे. अनेक लग्नसमारंभात मजा वाढवण्यासाठी भोजपुरी गाणी मोठमोठ्याने वाजवली जातात आणि लोक या गाण्यांवर नाचत यांची मोठी मजा लुटताना दिसून येतात. अशात आता यासंबंधित अनेक अनोखा व्हिडिओ साध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून आला आहे ज्यात चक्क एक साप भोजपुरी गाण्याची मजा लुटताना दिसून आले. दुर्लभ असणारे हे दृश्य पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आणि लोकांनी वेगाने हा व्हिडिओ शेअर करण्यात सुरुवात केली.
संतापजनक कृत्य! तरुणाने मांजरीसोबत केलं असं काही की…; नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप शांत एका ठिकाणी बसल्याचे दिसून येत आहे. त्याच्या पुढे एक मोबाईल फोन ठेवलेला असतो आणि यावर भोजपुरी सिंगर पवन सिंग यांचे गाणे वाजत असते. साप एकटक नजरेने गाण्याच्या क्लिपकडे पाहत असते आणि शांत बसून गाण्याची मजा लुटत असतो. त्याला हे गाणं इतकं आवडत की एक सेकंदही तो आपली नजर फोनकडून हलवत नाही. सापाचे हे दृश्य एका व्यक्तीने गुपचूप मागे उभं राहून आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान लोक आता या व्हिडिओवर चांगलेच खुश झाले असून सापाचे हे अनोखे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सापाचा हा व्हायरल व्हिडिओ @raj.yaduvansi.961 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘या आधुनिक जगात फोनने सर्वांना बिघडवून टाकले आहे’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ इतक्या वेगाने व्हायरल होत आहे की आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जीवनाचा आनंद लुटत आहे तो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नागू भाऊ पवन सिंगचा फॅन आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.