संतापजनक कृत्य! तरुणाने मांजरीसोबत केलं असं काही की...; नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हि़डिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच प्राण्यांसंबंधीही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे मांजर आणि कुत्रा पाळण्याचे लोकांनी प्रचंड आवड निर्माण झाली आहे. परंतु काही लोकांना कुत्रा आणि मांजरी अजिबात आवडत नाही. त्यांना त्यांचा अतिशय राग येतो. अनेकदा असे व्यक्ती रागात त्या मुक्या प्राण्याला मारतात देखील.
सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने माजंरीसोबत असे काही केले आहे की, नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे. हा व्हिडिओ मुबंईच्या मलाडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीचे नाव कासम सय्यद सांगण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मांजर चप्पल्लींच्या रॅकवर बसलेली आहे. हे चप्पीलंचे रॅक खिडकीजवळ आहे. याच वेळी एक व्यक्ती तिथून जाण्यासाठी येतो. बाजूलाच एक लिफ्ट असते. पहिल्यांदा तो लिफ्टजवळ जाऊन बटन प्रेस करतो. लिफ्टवर येत असते. तोपर्यंत व्यक्ती मांजरीजवळ जातो. व्यक्ती मांजरीला उचलतो. त्यानंतर व्यक्तीने असे काही केले आहे, की पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. हा माणूस मांजरीला खिडकीतून बाहेर फेकतो. सध्या या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
A man named Kasam Syed threw a cat down from the top floor. pic.twitter.com/n4cwxCNu0o
— Gayatri 🇬🇧🇮🇳(BharatKiBeti) (@changu311) June 11, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “कासम सय्यदने मांजरीला नवव्या मजल्यावरुन खाली फेकले असे सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @changu311 या अका ऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु माणसाने मांजरीला खाली का फेकले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका युजरने या माणसालाही असेच फेकून दिले पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.