Viral Video Man and Women fight on road video goes viral
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. मजेशीर, चित्र-विचित्र, भयावह अशा वेगवेळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. भांडणाचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. लोक कधीही कुठेही भांडयाला सुरुवात करतात. कधी मेट्रोत, कधी बसमध्ये, कधी भर रस्त्यात अशा वेगवेळ्या ठिकाणी तुम्ही अनेक भांडणांचे व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये अगदी लहान मुलांनापासून मोठ्यापर्यंत अनेकांच्या भांडणाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडताना लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे कोणतेही भान नसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आणि पुरुष भर रस्त्यात भांडण करताना दिसत आहेत. दोघांना आसपास काय सुरु आहे याचे कसलेही भान नाही. शिवाय दोघांनी एकमेकांना अक्षरश: रस्त्यावर लोळवले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने पुरुषाचा गळा आवळला असल्याचे दिसत आहे. दोघांमध्ये कोणत्या तरी कारमावरुन भांडण सुरु आहे. माणूस महिलेचा हात हटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानेही महिलेचा गळा जोरता आवळला आहे. महिलेच्या हातातून सुटका करण्यासाठी त्याने तिचे केसही धरले आहेत. परंतु महिला माणसाला सोडण्यास तयार नाही. दोघेही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. माणूस अगदी महिलेला जमिनीवर पडतो, पण महिला देखील चांगलीच खेळाडू निघाली आहे. तिने नवऱ्यालाच खाली पाडले आणि त्याचा गळ दाबून उभी आहे.
हा व्हिडिओ इथेच संपला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दृश्याचा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एक व्यक्तीने कैद केला आहे. परंतु त्याने जाऊन त्यांची भांडणे सोडवली नाहीत. यामुळे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘इतिहास साक्षी आहे, कोणत्याही कॅमरामॅनने कधीही कोणाला मदत केलीली नाही.’
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
इतिहास गावह है किसी कैमरा मैन ने आज तक किसी की मदद नहीं की 😜😂🤣😀 pic.twitter.com/yvsAhHiK3G
— Mahima Yadav (@SinghKinngSP) June 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SinghKinngSP या अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी यावर मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “कॅमरामेनचे काम फक्त रेकॉर्ड करणे आहे” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरेन “कॅमेरामॅन मदत करायला गेला असता तर, या व्हिडिओला लाईक्स मिळाले नसते”. तर एकाने, “बाकी सगळं ठीक आहे, पण त्यांच्यात भांडणं का सुरु होती?” असे विचारले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.