viral video man forgot his wife while driving video goes viral
अलीकडे सोशल मीडिया मनोरंजनाचे उत्तम साधन बनलेले आहे. कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळततात. अनेकदा काही व्हिडिओ असे असतात की पाहून हसून हसून पोट दुखून येईल. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक नवरा आपल्या बायकोला विसरुन गेला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहून तुम्ही देखील शेअर केल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी सुरु आहे. लहान मोठ्या-गाड्या येजा करत आहेतय याच वेळी एका बाईकवर एक व्यक्ती आपल्या बायको आणि मुलासोबत चालला आहे. दरम्यान अचानक एक मोठा ट्रक येतो ज्यामुळे व्यक्तीचा बॅलेन्स बिघडतो आणि बाईक थांबवतो. यावेळी बायोक गाडीवरुन खाली उतरते. पण नवरा तसाच गाजी घेऊन पुढे जातो. बायको आणि आसपासचे लोक त्याला आवाज देत असतात पण तो थांबत नाही. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Musibat se chhutkara pane ka tarika thoda casual hai 😂 pic.twitter.com/Blw8pKOY7S
— Ankit (@terakyalenadena) May 17, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @terakyalenadena या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संकटापासून दूर जाण्याचा मार्ग थोडा सामान्य आहे असले म्हटले आहे. अनेकांनी यावर मजेशीर अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरने ” तो नक्की पिलेला असणार” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पठ्ठ्या घरी जाऊन मार खाणार असे म्हटले आहे. आणखी एका युजरने त्याचे पोरग पण त्रासलेय असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.