viral video Man Made Press with a Shovel video goes viral Jugad Viral Video
सोशल मीडियावर कधी काया पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. डान्स, भांडण, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड करणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. जुगाड करणाऱ्यांच्या मते यामुळे त्यांचा वेळीही वाचतो आणि पैसेही वाचतात. अनेकदा काही जुगाड असे असतात की, पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते तर अनेकदा काही जुगाड असे असतात की आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही.
तसेच अनेकदा परिस्थिती देखील आपल्याला जुगाड करुन जगण्यास शिकवते. भारतातील लोक तर जुगासाठी ओळखले जातात. सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने जीन्सला इस्त्री करण्यासाठी असा भन्नाट जुगाड केला आहे की अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. कपडे इस्त्री करायची म्हटले तर आपण इलेक्ट्रिक प्रेसचा वापर करतो किंवा एखाद्या इस्त्रीवाल्याकडे इस्त्रीसाठी देतो. पण अनेकदा पैशा अभावी काही लोकांना ते शक्य होत नाही. मग अशा वेळी घरातील मंडळी काही अनोखा जुगाड करतात.
पूर्वी पितळाच्या तांब्यांत गरम कोळसा घालून कपड्यांना इस्त्री केली जायची. असेच काहीसे या तरुणाने केले आहे. तरुणाने चक्क फावडाच्या मदतीने पॅंन्ट इस्त्री केली आहे. त्याने फावडच्या पुढच्या भागावर गरम कोळसा ठेवला आहे. नंतर त्याने फावड्याच्या मदतीने कपडे इस्त्री केले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण फावड्यावर कोळसा टाकताना दिसत आहे. नंतर तो फावड्याच्या मदतीने पॅन्ट इस्त्री करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @networkamericana या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी तरुणाचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाउ मानले तुला. दुसऱ्या एकाने युजरने टेक्नॉलॉजिया असे म्हटले आहे. आणखी एकाने यामुळे त्याचे काम होत असेल तर यात हसण्यासारखे काय आहे अनेक हसणाऱ्यांना विचारले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.