छत्री घेऊन रेल्वे रुळावर झोपला; ट्रेन आली अन्...
सोशल मीडिया सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी असे व्हिडीओ व्हायरल होत असतात की पाहून पूर्ण दिवस खराब जातो. तर कधी असे आश्चर्यचकित करणआरे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक व्यक्तीने असे काही केले की सगळेच चकित झाले आहे. सहसा एखाद्या व्यक्तीला झोप आली तर तो शांत ठिकाणी झोपतो. जर माणूस कंटाळला असेल तर कधीही कुठेही झोप लागते.
आता या म्हाताऱ्यालाच बघा, त्याला झोप लागली तेव्हा तो छत्री घेऊन रेल्वे ट्रॅकवर झोपला. ट्रेन रुळावर आली तर आपले काय होईल याची म्हाताऱ्याला अजिबात चिंता नाही. असंच काहीसं झालं, रेल्वे रुळावर ट्रेन आली आणि म्हातारा शांत झोपत राहिला. रेल्वेच्या आवाजाने देखील तो उठला नाही. जेव्हा रेल्वे चालकाने ते पाहिले त्याने ट्रेन थांबवली आणि खाली उतरून म्हताऱ्याला उठवले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. जो आता वेगाने व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोक लोको पायलटचे खूप कौतुक करत आहेत.
हे देखील वाचा -ट्रेनमध्ये बसायला जागा न मिळाल्याने केला अनोखा जुगाड; पाहा व्हिडीओ
रेल्वे चालकाचे कौतुक
@gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी प्रयागराजहून एक ट्रेन निघाली होती. मौइमा रेल्वे क्रॉसिंगजवळून जाणाऱ्या फ्लायओव्हर ब्रिजजवळ ती पोहोचली, तेव्हा समोरचे दृश्य पाहून चालक थक्क झाला. रूळावर माणूस झोपलेला पाहून रेल्वे चालकाने तात्काळ ट्रेनमधून खाली उतरून झोपलेल्या वृद्धाला उठवले. त्याला झोपेतून उठवल्यानंतर लोको पायलटने वृद्धाला रुळावरून हटवले आणि ट्रेनसोबत निघून गेले. तो माणूस इतका गाढ झोपेत होता की त्याला ट्रेनचा आवाजही ऐकू आला नाही.
व्हायरल व्हिडीओ
A person was sleeping on the railway track with an umbrella. Seeing this, the loco pilot stopped the train, Then he woke him up and removed him from the track. Then the train moved forward in Prayagraj UP
pic.twitter.com/OKzOpHJeih— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 25, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक लोको पायलटचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत 8 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 5 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. कोणी म्हणे हा देशी दारूचा चमत्कार आहे तर कोणी म्हणे हा थकलेला माणूस झोपलेला आहे. तर काहींनी त्या म्हताऱ्याला शिक्षा द्या. त्याला फटके द्या म्हणजे नशेतून बाहेर येईल असे म्हणले आहे. लोकापायलेटचे अनेक लोक त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत.