
Man Caught Trying to Steal Sleeping Passenger's Pocket ( झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरी करण्याचा प्रयत्न करताना एक व्यक्ती पकडली गेली ) फोटो सौजन्य AI
रेल्वेने प्रवास करणे हे एक प्रकारे अनेकदा थकवणारे आणि आव्हानात्मक असू शकते. विशेषकरुन जनरल कोचमधून प्रवास करताना, आपल्या सीटपासून ते सामानापर्यंत प्रत्येक गोष्टी काळजी पूर्वक जपून वापरावी लागते.
मग प्रवासात ‘नजर हटी तो दुर्गटना घटी ‘ असा प्रकार प्रवाशांबरोबर होत असतो. त्यामुळे प्रवाशांचा निष्काळजीपणा सुद्धा मोठ्या संकटात टाकू शकतो.
बऱ्याच वेळा लांबच्या प्रवास असल्यामुले प्रवासी ट्रेन मध्ये गाढ झोपून जातात. याचा फायदा घेत ट्रेन मध्ये फिरनारे खिसे कापू गॅंग याचा फायदा नेहमी घेत असतात. यात त्याचा मोठा फायदा असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे प्रवासी आणि सोशल मिडिया युजर्स चकित आणि संतप्त झाले आहेत.
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ मध्ये एक प्रवासी ट्रेनच्या दाराजवळ बेशुद्धपणे झोपला आहे. प्रवासाच्या थकव्यामुळे, त्याच्या आजूबाजूला काय चालले आहे. याची त्याला जाणीव देखील नाही. याचाच फायदा घेत, जवळ बसलेला एक माणूस झोपलेल्या प्रवाशाच्या खिशाकडे हळूच हात नेतो. संशय येऊ नये याची काळजी घेत, तो अत्यंत सावधगिरीने खिसे तपासू लागतो. वरवर पाहता, ही एक सामान्य गोष्ट वाटते.पण व्हिडिओमधून त्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. तो प्रवाशाच्या खिशातून काहीतरी चोरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
A man was caught suspiciously hovering his hands near a sleeping passenger’s pockets before suddenly lying down and pretending to be asleep. A shameless pickpocket caught in action! https://t.co/4TFlx9aBxl — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 16, 2026
या व्हिडिओमध्ये सर्वात रंजक आणि आश्चर्यकारक वळण यानंतर येते. खिसा तपासत असताना, कोणीतरी आपल्याला पाहत आहे किंवा आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे, हे त्या माणसाच्या लक्षात येते. मग, तो पटकन आपला हात मागे घेतो आणि झोपल्याचे नाटक करतो. तो प्रवाशाच्या शेजारी झोपतो आणि डोळे मिटतो, जणू काही त्याला कशाचीच जाणीव नाही किंवा तो खूप वेळ झोपलेला आहे.
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर युजर्स कडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जण इतर प्रवाशांना प्रवास करताना आपल्या वस्तू आणि खिशांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जण त्या माणसाच्या अतिअभिनयाचा आनंद घेत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत.
Ans: ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाच्या खिशात हात घालून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा
Ans: आपल्यावर कोणाचे तरी लक्ष असल्याचे जाणवताच त्याने हात मागे घेतला आणि झोपल्याचे नाटक केले.
Ans: टकऱ्यांनी या व्यक्तीच्या अभिनयाची खिल्ली उडवली, तर काहींनी रेल्वे प्रवासात सामान आणि खिशांची काळजी घेण्याचा सल्ला दिला.