viral video Monkey enter in haldi Ceremony video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय लग्नासंबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नातील विधींचे, कार्यक्रमाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्हाला माहितच असेल भारतीय लग्नांमध्ये हळदीच्या समारंभाला खूप महत्त्व दिले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम असतो. नवरा-नवरीच्या सौंदर्यात आणखी भर पडावी यासाठी हा कार्यक्रम असतो. अलीकडच्या काळात हा कार्यक्रम भारतच नव्हे, तर परदेशी लग्नसमारंभात पाहायला मिळतो. अशाच एका विदेश लग्नसोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये नवरा-नवरीच्या हळदीचा कार्यक्रम सुरु असतो. याचवेळी एका माकडाची एन्ट्री होते. विशेष म्हणजे नवरीला हळद लावत असताना तिच्या अंगावर एक माकड अचानक उडी मारते. आणि पुढे जे घडते पाहून हसू आवरणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पाहुणे मंडील आनंदात हळदीचे सेलिब्रेशन करत आहेत. तेवढ्यात एका माकडाची कार्यक्रमात अचानक एन्ट्री होते. माकडे हळदीशेजारी ठेवलेली फळे उचलतो आणि निघून जातो. माकडाच्या अशा अचानक केलेल्या कृत्याने लोकांना गमंत वाटते. त्यानंतर आणखी काही माकड तिथे एन्ट्री घेतात आणि खाण्याच्या वस्तू घेऊन निघून जातात. सगळे पाहुणे जोरजोरता हसत असतात. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Bro Saw the opportunity and Took it😂 pic.twitter.com/FGMTQwgSrX
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रतंड व्हायरल होत असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ संधी कधीच सोडत नाही, तर दुसऱ्या एकाने विदेशी कधीपासून हळद सेलिब्रेट करायला लागले असे म्हटले आहे. आणखी एकाने दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम… अशी प्रतिक्रिया दिली आहे, म्हणजे ज्याच्या नशिबात जे असेल त्यालाच ते मिळते. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर हशा फोडला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.