मूर्खपणाचा कळस! तरुण धावत्या ट्रेनसमोर कोलांटी उडी मारायला गेला अन्...; स्टंंटबाजीचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी अलीकडे स्टंटबाजीचे प्रमाण प्रचंड वाढला आहे. विशेषत: तरुणांमध्ये स्टंटबाजीचे वेडं मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा या स्टंटबाजीचा परिणाम घातक ठरला आहे. अशा स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना यामुळे गंभीर दुखापत: झाली आहे. मात्र, तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणला स्टंटबाजी करणे चांगले महागात पडले आहे. हा तरुण धावत्या ट्रेनसमोर स्टंट करण्याचा प्रयत्न करत असून याचवेळी त्याच्यासोबत असे काही घडते की, यामुळे तो आपल्या जीवाला मुकला असता. एककीडे ट्रेन वेगाने प्लॅटफॉर्मवर येत आहे, दुसरीकडे हा तरुण स्टंटबाजी करत आहे. विशेेष म्हणजे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे स्टेशन दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे. एका बाजूने ट्रेन प्लॅटफॉर्मवर वेगाने येत आहे. याच वेळी एक तरुण प्लॅटफॉर्मवर स्टंट करत आहे. मोठ्या प्रमाणात लोक ये-जा करत असताना हा तरुण कोलांटी उडी मारतो. कोलांटी उडी मारताना तरुणाचा तोल जातो आणि याच वेळी एक आजोबा त्याच्यामागून जात असतात तेव्हा त्यांचा धक्का त्या तरुणाला लागतो. यामुळे तरुण जोरात खाली आदळतो. तो आपल्या मानेवर आदळतो यामुळे त्याच्या मानेला जोरदार फटका बसतो. कोलांटी उडी मारण्याच्या दरम्यान दुसऱ्या बाजूने ट्रेन येते असते. जर त्याचा तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला असता तर त्याचा जीव गेला असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @comedy__boy21 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा धक्कादायक प्रकार कुठे घडला याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना काहींना अलीकडे तरुणांना कोणत्याही गोष्टीची भिती राहिलेली नाही असे म्हटले आहे, तर काहींनी अशा लोकांना लय मार द्यायला हवा असे म्हटले आहे. काही लोकांनी सोशल मीडियामुळे अलीकडची तरुण पिढी बिघडत चालली असल्याचे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.