Viral video of an eagle flying with the sacred flag of the Jagannath Temple in Puri, Odisha video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहिल्यावर हसावे की रहावे कळत नाही तर काही व्हिडिओ असे असतात की पाहून संताप येतो. तसेच अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे मनात एक वेगळेच कुतूहल निर्माण करतात. अशा अद्भुत आणि चमत्कारिक घटना आपल्याला पाहायला मिळतात की त्या पाहून त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते.
सध्या असाच एक अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पुरीतील श्री जगन्नाथ मंदिरात एक वेगळीच घटना घडली. रविवारी (13 एप्रिल) रोजी मंदिराच्या शिखरावर असलेल्या नीलटक्रावर फडकवण्यात येणार पवित्र पतितपावन ध्वज एका गरुडाने घेतला आणि उडून गेला आहे. या दृश्याने हजारो भक्त आणि स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांच्या मनात कुतूहल आणि चिंतेची भावना निर्माण झाली आहे. अनेकांनी याला दैवी संकेत मानले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गरुड ध्वजला आपल्या पंजात पकडून मंदिराभोवती प्रदिक्षणा घालत आहे. त्यानंतर ते गरुड समुद्राच्या दिशेने उडत जाते आणि लोकांच्या दृष्टीआड होते. प्रत्यक्षदर्शनींनी सांगितलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. यावेळी अचानक नॉरवेस्टर वाऱ्याचे वादळही उठले. हे वादळ लहान परंतु जोरदार होते. या वादळात गरुड दृष्टीआड झाले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे सेवक ध्वज रोज बदलतात. यासाठी एका विशेष सेवकाला मंदिराच्या उंचावर चढावे लागते. ही सेवा अत्यंत धोकादायक असली तरी पूर्ण भक्तिभाव असतो. यामुळे गरुडाने असा ध्वज नेणे एक दैवी शक्तीचा संकेत मानला जात आहे. या व्हायरल व्हिडिओने लोकांमध्ये कुतूहलाचे वातावरण पसरलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी याला अशुभ मानले आहे, तर काहीं लोकांच्या मते हा एक पवित्र संकेत आहे. देव स्वत: ध्वजाचे रक्षण करत आहेत. मंदिर प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.