कावळा आणि सापात जीवघेणी टक्कर; थरारक झुजींचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी शिकार करताना, कधी शिकार होताना असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्ही आतापर्यंत मुंगस आमि सापाची झुंजीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक पण कावळा आणि सापाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या थरारक व्हिडिओमध्ये कावळा आपल्या पिल्लांचे आणि घरट्याचे रक्षण करण्यासाठी सापाशी द्वंद्वयुद्ध करत आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक कावळा आणि साप आमने-सामने आले आहेत. कावळा आपल्या चोचीने सापावर हल्ला करत आहे, तर साप त्याच्या हल्ल्यापासून वाचत त्याला द्वंश करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कावळा सतत सापावर हल्ला करत आहे. सापाला कावळ्याचा मारा सहन होत नाही. तो कावळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कावळा चोचीने सतत हल्ला करत राहतो. हे युद्धजवळपास एक तास चालू राहते. सध्या याचा थररारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवटी तुम्ही पाहू शकता की, कावळ्याने सातत्याने हल्ला करुन सापाला संपवले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#viralvideo : कौवा और सांप की लड़ाई का वीडियो हुआ वायरल, सीतापुर के डेलहा गांव का वीडियो #viral pic.twitter.com/LPUEOSOzKD
— Viralchhattisgarh (@viral36garh) April 14, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कप्शनमध्ये “कावळा आणि सापाच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल, सीतापूरमधील डेल्हा गावातील व्हिडिओ असे लिहिले आहे. यावरुन लक्षात येते की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील डेल्हा गावातील आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.