viral video of girl dancing on jcb video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. काही अंगवार काटा आणणारे व्हिडिओ असतात, तर काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे कळत नाही. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण, यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. कधी कधी काही लोक अशा कृती करतात ज्याची कधी आपण कल्पना देखील केली नलेस. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. हा व्हिडिओ बिहारचा असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये एक तरुणी एका बिहारी गाण्यावर डान्स करत आहे. आता तुम्ही म्हणाल यात हैराण होण्यासारखे काय आहे, तर तरुणी चक्क जेसीबीवर चढून डान्स करत आहे.
सहसा जेसीबीचा वापर खोदकाम करण्यासाठी केला जातो, पण या तरुणीने जेसीबीला स्टेज बनवले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जेसीबी उभा आहे. जेसीबीच्या पुढच्या भागावर एक तरुणी ठुमके मारताना दिसत आहे. तसेच तिलि पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली आहे. बायका-पोर जमलेली आहे. तरुणी बिनधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बिहारचा ऑर्केस्ट्रा असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी, मजेशीर मिम्स शेअर केले आहे. एका युजरने बिहार आहे, येथे काहीही होऊ शकते असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने बिहारचा ऑर्केस्ट्रा, बिगनर्ससाठी नाही, असे म्हटले आहे. आणखी एका युजरने जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, पण बजेट नसल्यामुळे जुगाड करावा लागतो तेव्हा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.