खतरों का खिलाडी! व्यक्तीने चक्क मगरीला मिठी मारुन केला डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले... (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा काही व्हिडिओ असे असतात की पाहून अंगावर काटा येतो, तर काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे कळत नाही. काही थक्क करणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एका धक्कादायक आणि धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावल आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक माणूस मगरीसोबत दिसत आहे. पण पुढे माणसाने जे केलं याची कधी कोणी कल्पना देखील केली नसेल. धक्कादायक बाब म्हणजे माणूस मगरीसोबत डान्स करत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, एक माणूस पाण्यात मगरीजवळ जातो. त्यानंतर तो मगरीला जवळ घेऊन मिठी मारतो. मग माणूस मगरीच्या पाय हातात पकडून अगदी कल्पस डान्स करतेत तसा डान्स करतो. मगरीला गोल गोल फिरवतो आणि नंतर मगरीला पाण्यात सोडून देतो. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पुरुष महिला पुरुषांपेक्षा जास्त का जगतात, तर कारण पुरुष असे लिहिले आहे आणि हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतील व्यक्तीला पाहून हा व्हिडिओ परदेशी व्यक्तीचा असल्याचे लक्षात येते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने, तो डिझनी प्रिंसेस बनला आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने खतरों का खिलाडी असे म्हटले आहे. आणखी एका युजरने भाऊ, यमराजला आव्हान देत आहे असे म्हटले आहे. चौथ्या एकाने मगर देखील क्षणाचा आनंद घेत असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी मजेशीर असे मिम्स देखील शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.