मुंबई लोकलमध्ये महिलांची केसांवरुन शाब्दिक बाचाबाची ; वाद विकोपाला गेला अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोडज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुंबई लोकलचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मुंबईची लोकल ही मुबंईतील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. या गर्दीच्या प्रवासात अनेकदा, विविध प्रसंग पाहायला मिळतात. कोणी भजन, गाताना, तर कोणी रील्स बनवताना दिसते. कधी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम लोकमध्ये रंगतो, तर कधी भांडणांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतात.
सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी आहे. अगदी पाय ठेवायला देखील जागा नाही. सगळ्या महिला एकमेकांनी चिकटून उभ्या राहिल्या आहेत. अशातच दोन महिलांमध्ये केसावरुन भांडण सुरु होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुबंईल लोकलच्या महिलांच्या डब्यातील दृश्य दिसत आहे. डब्यात प्रचंड गर्दी दिसत आहे. याच वेळी एक महिला आपले केस मागे झटकते. यामुळे मागे उभे असलेल्या एका महिलेच्या तोंडावर केस लागतात.
यामुळे ती महिला चिडते आणि केस का उडवतेस? असे दुसऱ्या महिलेला म्हणते. यावर केस झटकणारी महिला, माझे केस आहेत, मी काहीपण करेल असे चिडून उत्तर देते. यावरुन दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरु होतो. दोघी पण एकमेकांनी शिव्या देऊ लागतात. हे सर्व दृश्य त्याच डब्यातील एका महिलेने कॅमेरात रेकॉर्ड केले आहे. दोघीही भांडायचे थांबल्यावर डब्यात शांतता पसरते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two ladies inside Mumbai Locals over “Julfe kyu Udati hai” pic.twitter.com/YcUgN0mwdN
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “असाच प्रवास जातो रोज, युद्ध पाहता पाहता.” तर दुसऱ्या एका युजरने “इर्षा” असे म्हटले आहे. “भारतीय वेगळ्याच पातळीवर निराश असतात, असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.