viral video of World’s First Sperm Race video goes viral
आतापर्यंत तुम्ही, माणसं, प्राणी, पक्षी, गाड्या, बैलांची शर्यत याबद्दल ऐकले असेल तसेच या शर्यती पाहिल्या देखील असतील. कधी प्रत्यक्षात तर कधी लाईव्ह स्ट्रिनवर. शर्यत पाहण्याची मजा तर काही औरच असते. शर्यतीत कोण जिंकणार याची उत्सुकता लोकांमध्ये लागलेली असते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच एक अनोख्या शर्यतीबद्दल जाहीर करण्यात आले होते. ती म्हणजे शुक्राणू शर्यतीचा (Sperm Race), ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल.
काही दिवसांपूर्वीच ही जगातील पहिली शुक्राणू शर्यतीचा (Sperm Race) पार पडली. या अनोख्या स्पर्धेने लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. ही रेस नेमकी कशी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. ही रेस यशस्वीरित्या पार पडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही शर्यत 25 एप्रिल रोजी लॉस एंजलिस च्या ‘हॉलीवूड पॅलेडियम’ येथे आयोजित करण्यात आली होती. ही रेस HD कॅमेऱ्याने शूट करण्यात आली.
या शर्यतीत मानवी शरीराच्या प्रणालीपासून प्रेरित होऊन एक खास ट्रॅक तयार करण्यात आला होता. या ट्रॅकवर दोन वेगवेगळ्या शुक्राणूंचे (Sperm) नमुने सोडण्यात आले. ही संपूर्ण शर्यत HD कॅमेराच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आली. तसेच याचे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील करण्यात आले. क्रिकेटमॅच मध्ये ज्याप्रमाणे कॉमेंट्री केली जाते, तसेच याची शर्यतीची कॉमेंट्रि करण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्पर्म रेस कशाप्रकारे पार पडली. या स्पर्धेचा विजेता 20 वर्षीय ट्रिस्टन मायकेल आहे. मायकेल कॅलिफोरर्निया विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
The World’s First Sperm Race just happened 😭😭 pic.twitter.com/fImq0nuaOM
— Gozie (@guzygram) April 26, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या जगातील पहिल्या शुक्राणू शर्यतीचा (Sperm Race) व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @guzygram या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले आहे, जो जिंकला त्याला काय गिफ्ट देण्यात आले, तर दुसऱ्या एकाने आता फक्त हेच बघायचं राहिले होते असे म्हटले आहे. आणखी एका युजरने माणसाने खूप प्रगती केली आहे असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.