हिरोपंती पडली महागात! तरुण बाईक स्टंट करायला गेला अन्...; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाणा वाढत चालले आहे. विशेषत: तरुणांचा यामध्ये समावेश असतो. रोडवर वेगाने बाईक चालवत स्टंट करणे हे आता सामान्य बनत चालले आहे. यामुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे, अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय लोक आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक खतरनाक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्टंट करणे किती धोकादायक ठरु शकते याचे आणखी एक उदा. लोकांच्या डोळ्यापुढे आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवत आहे. याच वेळी रस्त्यावर इतर गाड्यांची देखील रहदारी दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकीस्वार बाईक स्पीड वाढवतो. नंतर तो बाईकचे पुढचे चाक हवेत उचलतो. पण अचानक त्याचा तोल जातो आणि तो बाईकवरुन खाली पडतो. तसेच बाईक देखील घासली जाते आणि तिचे तुकडे तुकडे होतात. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की, पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सुदैवाने या भीषण अपघातात तरुणाचा जीव वाचला आहे. परंतु हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Only can blame himself pic.twitter.com/6XKWCRpFDw
— Wild content (@NoCapMediaa) April 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @NoCapMediaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, दणकन आदळला आहे नक्कीच त्याला लागले असणार. दुसऱ्या एकाने भाऊने यमराजला आमंत्रण दिले होते, असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने एवढा धोकादायक स्टंट करायची काय गरज होती असे म्हटले आहे.
परंतु या व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे की, अशा धोकादायक स्टंटमुळे तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर तुमच्या मालमत्तेचे देखील नुकसान होते. यामुळे असे धोकादायक स्टंट करणे किती धोकादायक आहे हे व्हिडिओ पाहू तुमच्या लक्षात येईल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.