Viral Video Old Man Unique Jusgad to sleep in train Video goes viral
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या तर अजिबात कमी नाही. लोक असे असे जुगाड करतात की विश्वास बसत नाही. जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की, यामुळे पैसे आणि वेळही वाचतात. काही वेळा असे जुगाड उपयोगी येतात. तर काही वेळा जुगाड खूप भारी पडतात. सध्या एका जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल तर भारतीय रेल्वेंमध्ये प्रचंड गर्दी असते. अनेकदा डब्बे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अनकेदा उभे राहायला देखील जागा मिळत नाही. अशा वेळी प्रवासात झेप येत असेल तर तेही कठीण होऊन जाते. पण एका काकांनी ट्रेनमध्ये झापण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी झोपण्यासाठी असे काही केलं आहे की, त्यांच्या आसपासचे लोकही त्यांनी पाहून हैराण झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या डब्यात गर्दी असून काही लोक झोपलेले आहेत. काही तरुण मुले डब्यात सीट न मिळाल्याने खाली बसले आहेत. याचवेळी एक काकांनी झोप येत असल्याने त्यांच्याकडील एक कापड वरच्या सीटला बांधले आहे. पण त्यानंतर त्यांनी जे केले ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. त्यांनी त्यावर मान ठेवली असून निवांत झापलेले आहेत. बस, रेल्वेत झोपताना अनेकदा मान खाली कोसळते, पण या काकांनी कापडच्या सहाय्याने आपली मान लटकवली आहे. त्यांच्या आसपासचे लोक हे पाहून हसत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर@its_ravi_singhaniya4 या अकाऊंट शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आि व्ह्यूज मिळाले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर कले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काय डोकं लावलंय काका, तर दुसऱ्या एकाने भारीच, पण मला एक सेकंदासाठी वाटंल त्यांच्या मानेला काहीतरी झाले. हा व्हिडिओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
व्हायरल बाातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.