जीवघेणा खेळ! प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनला लटकत धोकादायक प्रवास; थरकाप उडवणारा Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडिया हे अलीकडच्या काळात मनोरंजनाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे साधन बनलेले आहे. घरबसल्या आपल्याला जगभरात कुठे काय सुरु आहे याची माहिती सोशल मीडियावर मिळते. कधी मजेशीर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तरी कधी धक्कादायक गोष्टी व्हायरल होतात. अलीकडे अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रस्ते अपघात, रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही लोक, वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे अनेकदा भयंकर अपघात घडतात. आतापर्यंत लाखो लोक अशा अपघातांचे शिकार झाले आहेत.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका प्रवाशांनी खच्चाखच भरलेल्या ट्रेनला लटकत लोक धोकादायक प्रवास करत आहेत. यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो याचे त्यांना जराही भान नाही. सध्या हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनचा आहे याबाबत कोणतीही माहिती नाही, मात्र, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बिहारचा असल्याचे म्हटले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन जात आहे. यामध्ये काही लोक बाहेरच्या बाजूला ट्रेनला लटकलेले दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, अगदी पाय ठेवायला देखील जागा नाही तरीही लोक ट्रेनमध्ये चढत आहेत. अक्षरश: खच्चाखच भरलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिावर चांगलाचा व्हायरल होत आहे. या लटकुन प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेष करुन तरुण लोकांचा समावेश दिसत आहे. ट्रेन महाकुंभ मेळाव्याला जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @barh_ka_blogger या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण हैराण झाले असून अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, मात्र, यावरुन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अशा धोकादायक प्रवासामुळे आपला जीवही जाउ शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने भन्नाट व्हिडिओ आहे हा असी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका युजरने एखाद्याचे डोके खांबाला धडकूद्या मग अक्कल येईल यांनी असे म्हटले आहे. तर काहींनी अशा लोकांना जीवाचं काही बरं वाईट झाल्याशिवाय लक्षात येत नाही असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.