दिल्ली मेट्रोत पुन्हा एकदा राडा! तरूणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज प्रत्येक सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून हसून पोट दुखून येते. तसेच तुम्ही दिल्ली मेट्रो संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत राहते. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तुम्ही मेट्रोत कधी भांडणांचे तर कधी कोणी मेट्रोत डान्स बनवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल होत असतात. तर कधी कोणी मेट्रोमध्ये पत्ते खेळताना दिसते. या सर्व गोष्टींमुळे दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते. सध्या मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केली आहे. मात्र ही भांडणे कोणत्या कारणांवरून झाली याबबत काही माहिती नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्याच ठिकाणी निळा रंगाचा शर्ट घातलेला एक माणूस एका तरूणाला मारत आहे. तो त्यांच्या पाठीत मारून त्याला खाली पाडतो. नेतर तो त्याच्या अंगावर उड्या मारतो. तसेच आणखी एक तरूण देखील त्याला लाथांनी मारतो. काही लोक तिथेच बसलेले असतात. कोणीही भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तसेच या प्रवाशामधील एकानेच या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मात्र भांडण थांबवण्याचा विचार केला नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
No-Context Delhi Metro Kalesh
pic.twitter.com/lCudsXlBW9— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्ण एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे नेहमीचेच झाले आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना मेट्रोत चढूनच दिले नाही पाहिजे. आणखी एकाने म्हटले आहे की, त्या बिचाऱ्याचा जीव गेला असेल. चौथ्या एकाने म्हटले आहे की, व्हिडिओ बनवणाऱ्याला पण कळत नाही का आधी भांडण थांबवावे. हे चुकीचे आहे. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.