फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही चिमुकल्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अलीकडे ही लहान मुले-मुलीं जरा जास्त टॅलेंटेड आहेत असे म्हणायला हरकत नाही. आता डान्स सारख्या गोष्टींमध्ये विशेष म्हणजे लावणी करण्यात फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. मुले देखील लावणीवर मस्त असे एक्सप्रेशन देत नृत्य करतात. यामध्ये फक्त मोठी मुलेच नाही तर लहान चिमुकले सुद्धा आपले टॅलेंटने लोकांची मने जिंकतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने चंद्रा या लोकप्रिय लावणीवर असा ठुमका धरला आहे की, पाहणारे हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल आणि सारखा सारखा पाहाल. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओला दिवसेंदिवसे अधिक व्हूज मिळत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चिमुकल्याचा भन्नाट डान्स
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या घरात शर्ट-पॅन्टवर डान्स करत आहे. सुरूवातील तो प्रथम लावणीचा ठेका धरत नृत्य सुरू करतो. तो मराठीती प्रसिद्ध गाणे चंद्रा या गाण्यावर डान्स करत असतो. यावर तो छान एक्सप्रेशनही देतो. हळूहळू चिमुकला गाण्यावर छान डान्स करायला सुरूवात करतो. हा व्हिडिओ त्याच्या घरातल्याच व्यक्तीने शूट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. अनेकांनी त्याच्या डान्स कौशल्याचे कौतुक केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sanket____gomade या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देत या चिमुकल्याचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, खूपच छान बाळा, अप्रतिम. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खूपच छान दादा. आणखी एका युजरने नाद खुळा अशी प्रतिक्रीया दिली आहे. चौथ्या एकाने भाऊ, भारीच राव, मस्त, अप्रतिम डान्स. आणखी एकाने यार ही बारकी मुले खूपच टॅलंडेट आहेत असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.