Viral video restarunt scandle video goes viral
सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे. आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर आपण तिथली स्वच्छता आणि मग जेवमाची चव पाहतो. पण अनेकदा रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात काय चालले आहे हे आपल्याला माहित नसते.
सध्या असाच एक रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकचा कीस रेस्टॉरंटचे कर्मचारी घाणरेड्या पाण्यात भांडी धुवत आहे, तसेच एक व्यक्ती एका ग्राहकाच्या ताटातील उरलेला कांदा दुसऱ्या ताटात ठेवत आहे. संपूर्ण परिसर अगदी अस्वच्छ आहे. हा धक्कादायक प्रकार हैदराबादमधील एका रेस्टॉरंटचा असल्याचे व्हिडिओत कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर अनेकांनी प्रशासनाकडे कक कारवाईची मागणी केली आहे. तर काहींनी प्रशासनावर अशी लोकांची चौकशी नीट न केल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ हैदराबाद अमृतसर हवेलीमधील असल्याचे व्हिडिओ बनवणाऱ्याने सांगितले आहे. त्याने आरोप केला आहे की, हे रेस्टॉरंट भारतातल्या मोठ्या रेस्टॉरंटपैकी असून तिथे ग्राहकांच्या ताटातील उरलेला कांदा दुसऱ्या ग्राहकांना दिला जात असल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रावर @foodsafetywar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या विरोधात आवाज उठवणं गरजेचे आहे असे या व्हिडिओच्या कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील संताप येईल. काही लोकांनी ढाब्यावरचे आणि गाड्यावरचे रेस्टॉरंटपेक्षा चांगले असते असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.