सुनावणीसाठी आले, पण कोर्टाबाहेरच जुंपले; सास-सुनेच्या भांडणाचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सासु-सुनेमध्ये क्वचितच तुम्ही चांगले संबंध आपल्याला पाहायला मिळतात. नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणावंरुन भांडत होतच असते. काही वेळा वाद इतके टोकाला जातात की वादाचे रुपांतर हाणामारीत देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सासु-सुनांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोर्टाच्या गेटबाहेरच सास आणि सुनेच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
ही घटना नाशिकमधील कोर्टाच्या आवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेच्या प्रकरणाची कोर्यात सुनावणी होणार होती. यासाठी सासु आणि सुनेच्या कुटूंबातील सदस्य कोर्टाबाहेर उपस्थित होते. कोर्टाच्या गेटवरच सुनेचा भाऊ दीपक सालवे आणि सासु यमुना निकम यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की याचे रुपांतर शिवीगाळ करत हाणामारीत झाले. काही क्षमांतच यामध्ये कुटूंबातील इतर लोकही सामील झाले.
वाद इतका चिघळला की दोन्ही बाजूंच्या पुरुष आणि महिला एकमेकांना मारायला लागले. कोर्टाच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या भांडणात कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते, परिणामी कोर्टाबाहेरच राडा सुरु झाला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नाने भांडण सोडवले. दोन्ही कुटुंबांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
कोर्ट के गेट के बाहर ही सास बहु और परिजन आपस में भिड़े, जमकर हुई मारपीट, तारीख पर पहुंचे थे परिवार के लोग, नाशिक की घटना का वीडियो आया सामने !!
सास और बहु में अच्छे संबंध बहुत कम देखने को मिलते है, कई बार देखने में आया कि इनके बीच विवाद और मारपीट भी होती है, ऐसा ही एक वीडियो… pic.twitter.com/MdWYm4GU6m
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) February 21, 2025
नटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून. नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी यावर संताप व्यक्त केला आ तर काहींनी विनोदी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने अरे देवा, आवरा यांना असे म्हटले आहे, तर काहींने खूप चिंताजनक आहे हे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.