T-Shirt प्रिंटींगचा अनोखा जुगाड पाहिला का? तुम्हालाही नक्क आवडेल, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर दर सेंकदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चिक्ष-विचित्र व्हिडिओ पाहायाला मिळतात. याशिवाय डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. याशिवाय लोकांच्या भांडणाचे देखील व्हिडिओ, तसेच वेगवेगळ्या गोष्टींवरील मीम्स व्हायरल होत असतात. याशिवाय, मेकअप, कपडे यासंबंधित देखील अनेक व्हिडिओ असतात. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ एका अप्रतिम जुगाडाचा आहे. अलीकडे प्रिंटेड टी-शर्ट घालण्याचा ट्रेंड सुरु आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हे टी-शर्ट कसे प्रिंट केले डात. कदाचित तुम्ही यासंबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील टी-शर्ट प्रिटींगचा आहे. एक महिलेने अनोखा जुगाड करुन टी-शर्ट प्रिंट केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अप्रतिम जुगाड
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गटाराच्या झाकणाजवळ जाते. त्यानंतर ती झाकणावर डिझाईन्स असलेल्या भागावर पांढऱ्या रंगाने रंगवायला सुरुवात करते. मग डिझाईनवर रंग लावल्यानंतर, त्यावर एक काळा टी-शर्ट ठेवते. तो काळा टी-शर्ट पूर्णपणे दाबून घेते. असे केल्याने, त्यावर लावलेले रंग एका खास स्वरुपात टी-शर्टवर छापले जात. तुम्ही पाहू शकता की, टी-शर्टवर एक अप्रतिम डिझाइन दिसून येते आहे. अशाप्रकारे मुलीने जुगाड वापरून अप्रतिम प्रिंट काढली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
T-shirt प्रिंटिंग का ये जुगाड़ भी कमाल है। pic.twitter.com/M1626mJkx3
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) January 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sheetal2242 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘टी-शर्ट प्रिंटिंगचा हा जुगाडही अप्रतिम आहे’, असे लिहिले आहे. 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, यार काय प्रिंट झालेय अमेझिंग, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मलाही असा टी-शर्ट हवाय, भारीय यार. अशा प्रतिक्रीया देत अनेकांनी हा या मुलीचे कौतुक केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.