फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तप्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी गेल्या चार वर्षापासून एकत्र होते. मात्र, तरुणीने दुसऱ्या मुलांशी मैत्री केल्याने तिच्या बॉयफ्रेंडला राग आला. रागातून हा असा जीवघेणा हल्ला त्या गर्लफ्रेंडवर केला. तरुणाने भर रस्त्यात तरुणाचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्य. लोकांनी या तरुणीचा जीव वाचवला आणि त्वरित मुलीला रुग्णालयाच दाखल केले. या घटनेची माहिची मिळताच पोलिसांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुलीच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस कर्मचारी तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तरुणीचा बॉयफ्रेंड खूप संतापलेला असून तो मुलीचा गळा ओढणीने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आसपास असलेले लोक त्या तरुणीला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणाने आपली पकड घट्ट केली आहे. तो तरुणीला सोडण्याचा कोणताही विचार करत नाही. दरम्यान काही प्रयत्नानंतर लोक मुलीली सोडवताता आणि त्या मुलाला बेदम मारहाण करतात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मुलगी बेशुद्ध पडलेली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
🚨 In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled, but the public saved her!
FIR filed against boyfriend Rahul, search ongoing.
(🎥 @SachinGuptaUP)#Amroha #UttarPradesh pic.twitter.com/mwWMuBnGmH
— Indian Trend 𝕏 (@IndianTrendX) January 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @IndianTrendX ने शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या मुलालवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, मुलीने कोणाशी बोलायचे, कसे राहायचे, अशा गोष्टी ठरवणारे हे लोक आहेत तरी कोण असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.