फोटो सौजदन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. मनोरंजनाशिवाय अंगावर काटा आणणारे अनेक धक्कादायक अपघातांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये काही पर्यटक गोठलेल्या तलावात अडकले आहे. हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातील आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटा येईल.
हिवाळा म्हटले की, लोक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक बर्फाळ प्रदेशांना भेट देतात. जम्मू काश्मिर, शिमला मनाली, अरुणाचल अशा ठिकाणी बर्फाचा आनंद घेण्यासाठी लोक जातात. हे बर्फाने व्यापलेले प्रदेश आणि गोठलेले तलाव मोठे आकर्षण असतात. मात्र, या सौंदर्याचा आनंद घेताना नियमांचे पालन करणे आणि स्वत:ची काळजी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे न केल्यास संकट ओढवू शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील गोठलेल्या सेला तलावात घडलेल्या अशाच एका घटनेचा आहे.
नेमकं काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, काही लोक गोठलेल्या तलावावर चालताना दिसत आहेत. दरम्यान, अचानक बर्फ तुटतो आणि चार लोक तलावाच्या पाण्यात पडतात. यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. हे लोक मदतीसाठी आरडाओरड करू लागतात. त्याचे वेळी तेथील इतर पर्यटक त्यांना मदत करण्यासाठी येतात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात. या घटनेचा थरारक प्रसंग पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
At Sela Pass in Arunachal Pradesh. My advice to tourists: Walk on the Frozen Lakes with experienced people, drive carefully on slippery snow roads and be aware of snow avalanche. Temperatures is freezing so wear warm clothes and enjoy. Your safety is important. pic.twitter.com/UWz8xOzd57
— Kiren Rijiju (@KirenRijiju) January 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ KirenRijiju या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या लोकांना गोठलेल्या तलावातून कसे बाहेर काढले गेले याविषयी सांगितले आहे. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे, तर काहींनी मदत करणाऱ्या पर्यटकांचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, “शिकलेले असूनही लोक अशा चुका का करतात?” तर, दुसऱ्या एकाने “क्षणभराच्या आनंदासाठी जीव धोक्यात का घालता?” असा प्रश्न विचारला आहे. यापूर्वीही पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.