रिक्षा चालकाने केले रस्त्यावरचा खड्डा बुजवण्याचे काम
इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. आत्तापर्यंत तुम्ही डान्सचे, लग्नाचे, भांडणाचे, यांसारखे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण कधी असेही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्य वाटते. तर कधी असे व्हिडीओ समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. तर कधी कौतुक करण्यासारखे व्हिडीओ पाहायला मिळतात. असे व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय स्वतःला रोखू शकणार नाही. एका रिक्षा चालकाचा हा व्हिडीओ आहे. या रिक्षा चालकाने रस्त्यावरचा खड्डा बुजवण्याचे काम केले आहे. यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे.
रिक्षा चालकाने रस्त्यावरील खड्डे भरले
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका रस्त्याचा आहे जिथे मोठा खड्डा दिसत आहे. हा खड्डा पाहिल्यानंतर एका ऑटोचालकाने ते भरण्याचे ठरवले. आणि यानंतर त्याने खड्डा भरण्यास सुरुवात केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती विटांचे तुकडे आणि भंगार टाकून खड्डा भरताना दिसत आहे. माणसाच्या या चांगल्या कामाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आणि व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याचे कौतुकही केले.
हे देखील वाचा – हाहाहा! मॉर्निंग वॉकचा प्लॅन कॅन्सल केला; मित्र बॅण्ड-बाजा घेऊन घरी, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ghantta नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे. व्हिडिओ शेअर करताना, ‘मला या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे’ असे कॅप्शन लिहिले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘धर्मापेक्षा मानवता मोठी आहे.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘आपल्या देशाला अशा लोकांची आणखी गरज आहे.’ आणखी एकाने लिहिले की, खरंतरं हे काम सरकारचे आहे, पण भाई, तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तर अजून एका युजरने सरकार काय करत आहे असा प्रश्न विचारला आहे.