फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकवेळा असे धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात ज्या पाहून त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. काही व्हिडिओ लोकांना असा विचार करायला भाग पाडतात की कोणीतरी खरंच असं काही करू शकतं का. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ सोशलस मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का की तुम्ही सकाळी उठून रोज चालयला जायचा ठरवले आणि तुम्ही गेला नाही. किंवा तुमचा मित्र आला नाही. अशा वेळी तुम्ही काय करता. एकतर तुम्ही त्याला विचारता की तो का आला नाही किंवा त्याच्याशिवाय फिरायला जाता. पण इथे काही वेगळेच झाले आहे. एक व्यक्ती फिरायला आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याच्या घरी बॅण्ड घेऊन गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
बॅण्ड-बाजा घेऊन मित्राच्या घरी
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती घराबाहेर पडते. घरातून बाहेर पडताच त्याला दिसले की बरेच लोक बॅण्ड घेऊन आले आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की जेव्हा तो माणूस ठरल्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला नाही तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला घेऊन जाण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधले आहे. जेव्हा व्यक्ती घरातून बाहेर येतो आणि अचानक त्याचे काही मित्र बँड घेऊन उभे असलेले पाहतो. तो आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या मित्रांना काय होत आहे ते विचारतो. यावर त्याचे मित्र हसतात आणि म्हणतात की हे सर्व घडत आहे कारण त्याने आज मॉर्निंग वॉकला जाण्याचे वचन दिले होते, परंतु त्याने आपला शब्द पाळला नाही. यानंतर सर्वजण हसतात आणि त्याची चेष्टा करतात आणि बँड वाजवू लागतात. व्हिडिओमध्ये ही मजेशीर घटना दाखवून लोक त्याला खूप पसंत करत आहेत.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर newrative या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओचा आनंद लुटला आहे. अनेकजण व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला ‘मैत्रीचे खरे उदाहरण’ म्हणत आहेत, तर काहीजण याला ‘मस्तीचा नवा ट्रेंड’ म्हणत आहेत. एका युजरने सोशल मीडियावर कमेंट केली की, मित्रांमधील बाँडिंगचे हे उत्तम उदाहरण आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “अशा अनोख्या विनोदांनी मैत्री घट्ट होते.”