Viral Video: श्वानाने केला सिंहावर हल्ला, सिंहाची हवा झाली टाईट, घाबरलेला सिंह पाहून नेटकरी झाले आवाक् म्हणाले...
सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. आपल्या धाडसी आणि त्याच्या हिंसक स्वभावामुळे त्याला ही पदवी देण्यात आली आहे. हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहताच फक्त प्राणीच काय तर माणसंही थरथर घाबरू लागतात. सिंहाशी कोणी भिडला तर त्याची काही खैर नाही असे म्हटले जाते. आपण आजवर सिंहाला फक्त हिंसक प्राणी म्हणून बघितले मात्र तुम्ही कधी घाबरलेला सिंह पाहिला आहे का? सिंहाचे अनेक व्हिडिओ सोशल मेडियावर व्हायरल होत असतात. सध्या सिंहाचा श्वानाला घाबरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यातील सिंहाचे घाबरलेला रूप पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हिंसक स्वभाव आणि शिकारीचे त्याचे कसब पाहून भले भले प्राणी सिंहाला बघून पळून जातात; पण या व्हिडीओत चक्क सिंहांवर पळून जाण्याची वेळ आल्याचे दिसतेय. त्यात सिंहांबरोबर जे काही घडलं, ते पाहून तुम्हीही आवाक् व्हाल. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका जागी एक सिंह आणि त्याची पत्नी म्हणजेच सिंहीण आराम करत बसले आहेत तितक्यात तिथे एक कुत्रा येतो आणि दोन्ही सिंहांवर हल्ला करतो. इथपर्यंत ठीक होते; पण या कुत्र्याच्या भुंकण्याने सिंह इतके घाबरले की, ते त्याला बघून चक्क मागे पळू लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल… चिमुकलीचा Video Viral
यानंतर दोन्ही सिंह कुत्र्याला घाबरून त्याच्यापासून अंतर बनवत लांब उभे राहतात. कुत्रा थोडावेळ त्यांच्यवर भुंकतो आणि मग परत तिथून जाऊ लागतो. पण, सिंहांचे मन अजून भरलेले नसते. ते त्या कुत्र्याच्या मागे लागतात. त्यावर कुत्रा पुन्हा वळतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो व भुंकायला लागतो. मुख्य म्हणजे, सिंह कुत्र्यावर हल्ला न करता केविलवाण्या नजरेने कुत्र्याकडे बघत राहतात आणि त्याच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. व्हिडीओच्या शेवटी कुत्रा तिथून निघून जातो. त्या सिंहांकडे कुत्र्याकडे हताशपणे शांतपणे उभे राहून पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणवते.
हेदेखील वाचा – Teachers Day: आपल्या अंतिम क्षणातही शिक्षक मुलांचा अभ्यास चेक करत राहिला अन्… ह्रदयद्रावक Video पाहून अनेकांना अश्रू अनावर
हा मजेशीर व्हिडिओ @the.laugh.villa नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे की, “जंगलाचा नवीन राजा अपडेट झाला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, आमच्या गल्लीत कुत्रासुद्धा सिंह आहे. मी हे फक्त ऐकले होते; पण आज पाहिलेदेखील.