पतीबरोबरच्या वादात होत्याच नव्हतं करून बसली पत्नी, रागात मारली तलावात उडी अन् मग... Video Viral
पती पत्नीमध्ये राग, भांडण होणे ही फार सामान्य गोष्ट आहे. असे म्हणतात, जिथे प्रेम असत तिथे वाद-भांडणदेखील असतंच. मात्र कधी कधी या वादांमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असतो. बऱ्याचदा तर या वादामुळे अनेक अविश्वसनीय घटना घडून बसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि यानंतर रागाच्या भरात पत्नी थेट असं काही करून बसली ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
माहितीनुसार, पाषाण देवी मंदिराजवळ ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला नैनितालमधील तलावात बुडताना दिसत आहे. तेवढ्यात एका नाविकाची नजर त्या महिलेवर पडते आणि तो लगेच तिला वाचवायला जातो. तो बोट घेऊन त्या महिलेपर्यंत पोहोचतो आणि तिला वाचवतो. पण वेळीच जर तो नावीक तिथे पोहोचला नसता तर महिलेसोबत काही अघटित घडण्याची शक्यता होती.
हेदेखील वाचा – ‘रिझर्वेशन आहे तर सीट घरी घेऊन जाशील का?’ रेल्वेमध्ये सीटवरून दोन तरूणांमध्ये राडा
महिलेला पाण्यातून काढल्यानंतर तिला जावळीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादाला कंटाळून तिने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आपला जीव संपवण्यासाठी महिलेने तलावात उडी मारली. महिलेने तलावात उडी मारताच ती तलावात बुडू लागली. तिला बुडताना पाहिल्यानंतर जवळील नाविकाची तिच्यावर नजर पडली आणि त्याने बोट तिच्या दिशेने वळवत तिचा जीव वाचवला. यानंतर त्याने महिलेचा हात धरून तिला बोटीवर ओढले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
After a fight with husband, wife jumped into Nainital lake and was drowning… then boat driver rescued her🙏
Massive respect to this boat driver! pic.twitter.com/0QxjUshVGS
— Uttarakhand (@UttarakhandGo) September 17, 2024
हेदेखील वाचा – एसी व्हेंटमधून अचानक बाहेर आला साप अन्…;पुढे जे झाले ते पाहून उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल
या सर्व घटनेचा व्हिडिओ @UttarakhandGo नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने नैनिताल तलावात उडी मारली आणि बुडत होती…तर बोट चालकाने तिला वाचवले असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर होताच यावर अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “परिस्थितीपासून पळून जाऊ नये, जीवनाचे मूल्य काय आहे हे तुम्हाला माहीत असेलच…मोठी दुर्घटना घडल्याशिवाय लोक शुद्धीवर येत नाहीत. पोलिसांनी तलावात उडी मारलेल्या महिलेवर तात्काळ कारवाई करावी.. तिचा जीव अनमोल आहे, ती आत्महत्या करू शकत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल लोकांना काय झाले आहे? लहान सहन गोष्टींवर जीव द्यायला जातात”.