फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. भांडणाचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कोणीतरी गुपचुप असे भांडणाचे व्हिडीओ काढतो. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. रेल्वेमध्ये तर सीटवरून अनेकांची भांडणे होत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सारखे पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका रेल्वेमध्ये दोन तरूणांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.
रेल्वेत तिकिटांसाठी नेहमीच गर्दी असते. काही लोक ऑनलाईन तिकीटे बुक करतात. तर काही लोक प्लॅटफॉर्मवर तिकिट काढतात. अनेकांकडे तिकीटही नसल्यामुळे ते रेल्वेच्या आरक्षित डब्यात चढतात आणि इतर प्रवाशांच्या सीटवर बसतात. प्रवासीसुद्धा अशा लोकांना पाहून अनेकदा त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष करतात मात्र काही वेळा काही प्रवासी सीटवरून भांडू लागतात. असाच प्रकार एका ट्रेनमध्ये पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण सीटसाठी प्रवाशासोबत भांडताना दिसत आहे. त्याचवेळी सीटवर झोपलेली व्यक्ती प्रवाशाला त्या सीटवर बसण्यास सांगत आहे. पण तो व्यक्ती त्याचे ऐकत नाही, तुम्ही उठा ही माझी सीट आहे, मला इथे बसायचे आहे असे म्ङणते. त्यावर सीटवर झोपलेली प्रवासी पुन्हा त्याला बाहेर बसण्यास सांगतो. पण तो ऐकत नाही. यावर झोपलेला तरूण एकदम रागात येतो आणि भांडू लागतो. तर दुसरा व्यक्ती त्याला मी रिझर्वेशन केले आहे तुम्ही उठा असे म्हणत राहतो. यावर ती व्यक्ती तुला आता बसूनच देणार नाही असे बोलतो आणि म्हणतो रिझर्वेशन आहे तर काय सीट घरी घेऊन जाणार का? यावरून अचानक त्यांच्यात मारामारी सुरू होते. पण पुढे काय झाले ते व्हिडीओ संपल्यामुळए काही कळाले नाही.
व्हायरल व्हिडीओ
Verbal Kalesh b/w Passengers Inside Indian Railwas over the guy in white shirt didn’t have Reserved Seat but he wanted to Sit
pic.twitter.com/xuo7oJOa2t— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तरूण चुकीचा असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे लोक सीट रिझर्व करत नाहीत आणि त्यांना दुसऱ्यांना त्रास देतात. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे अधिक कर्मचारी असले पाहिजे’ तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘रेल्वेने प्रत्येक डब्यात आरक्षणाचे नियम चिकटवले पाहिजेत’