viral video thief being hanged on window of running train video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, भाडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चि६ि-विचित्र अशा घटनांचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे सत्य घटनांवर आधारित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चोरीच्या घटना, अपघाताच्या घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचे सीसीटीव्हित कैद झालेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सध्या चोरीच्या घटनेचा एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने धावत्या ट्रेनमधून लटकत चोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्याला हा प्रयत्न चांगलाच महागांत पडला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य आणि भय व्यक्त केले आहे. चोरट्याचा हा जिद्दीचा प्रकार पाहून नेटकरीही चक्रावले आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, अद्याप हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोके चक्रावेल.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, चोरटा ट्रेन सुरू झाल्यानंतर ट्रेनच्या खिडकीवर लटकतो. ट्रेन अत्यंत वेगाने धावत असते. तरुण प्रवाशांच्या सीटखाली सामान शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा जीव धोक्यात असूनही तो चोरी करायची धडपड सुरूच ठेवतो. डब्यातील प्रवासी घाबरून त्याच्यापासून लांब जातात, तर काहीजण त्याचा व्हिडीओ शूट करत असतात. एका शूट करणाऱ्याने त्याचा हात धरुन ठेवलेला असतो. हा प्रसंग थरारक असून चोरट्याचा जीव कधीही जाऊ शकतो, तरीही तो चोरी करण्याचा प्रयत्न सोडत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर travel_with_ahmad0 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला काही तासांतच 33 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरने या चोराला ‘प्रो मॅक्स चोर’ असे नाव दिले आहे. तर दुसऱ्या एकाने हा प्रकार पाहून त्याला ‘धूम ४’मध्ये घेण्याचा सल्ला दिला आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, काही नेटकऱ्यांनी ट्रेन थांबवून त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले का? असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडीओ काही लोकांसाठी मनोरंजनाचा विषय बनला आहे. मात्र, ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. चोरी हा गुन्हा असून, त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.