खराटा अन् बादलीने एकमेकींना झोडपत आजीबाईंची जोरदार हाणामारी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. तसेच अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आश्चर्यात पाडतात. तसेच तुम्ही स्टंट, जुगाड आणि भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. महिलांच्या भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ दोन आजीबाईंचा आहे. दोन आजी भर रस्त्यात अशा भांडत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरण कठीण होईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिुडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन आजी चिखल असलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. एका आजीच्या हातामध्ये बकेट तर दुसऱ्या एका आजीच्या हातामध्ये खराटा आहे. दोधीही काहीतरी बोलत आहेत. अचानक बकेट असलेल्या आजीला राग येतो आणि ती दुसऱ्या आजीच्या पाठीमध्ये जोरत बकेटने मारते. त्यानंतर दुसऱ्या आजी खराट्याने मारायला लागतात. दोघीपण एकमेकीॆंना मारायला लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- तुफान राडा! एसटी बसमध्ये महिला भिडल्या; झिंझ्या उपटत जोरदार हाणामारी,VIDEO व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sk_jkraj या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखी दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बाप रे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय हे आजी असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ या बायका काय कमी होत्या का आता आजी पण भांडायला लागल्या. अशा मजेशीर प्रतिक्रीया लोकांनी केल्या आहेत. हा व्हिु़डिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा- आजीचा नादच खुळा! लावणी डान्सरसोबत धरली जुगलबंदी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.