फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर मिनिटाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा इतके मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. तुम्ही सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश असतो. आजी-आजोबा देखील आपले टॅलेंट दाखवायला मागे राहत नाहीत.
सध्या असाच एक आजीचा हटके व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे. आजीने एका डान्सरसोबत असा ठुमका धरला आहे की पाहून तुम्ही देखील म्हणाल एकदम कडक. आजीने मनमुरादपणे डान्स करण्याचा आनंद लुटला आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक मोकळा परिसर दिसत आहे. या परिसरात एक मोठे स्टेज बांधण्यात आले आहे. तसेच अनेक खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. काही प्रेक्षक, एक कॅमेरामॅन तिथे दिसत आहे. स्टेजवर एक डान्सर महिला डान्स करत आहे. तिच्यापुढे स्टेजसमोर आजी देखील आहेत. त्यांनी देखील मस्त ठुमका धरला आहे. आजी डान्सरसोबत मस्त जुगलबंदी करत आहेत. तसेच डान्सरदेखील त्यांच्या सोबत नाचत आहे. हा व्हिडिओ तेथीलच एका व्यक्तीने स्टेजच्या बॅक साईडवरून रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर lavanipremi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, या वयातही एवढी स्फूर्ती, आजीचा नाद नाय करायचा, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की,आजी नक्कीच त्यांच्या जवानीत मस्त डान्सर असतील. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आजीचा नादच खुळा.अशा अनेक प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फक्त नाद पाहिजे असे लिहिलण्यात आले आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.