फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. तसेच अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आश्चर्यात पाडतात. तसेच तुम्ही स्टंट, जुगाड आणि भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. महिलांच्या भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये आपल्याल अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये प्रवाशांमदील भांडणे देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी सीटवरून तर कधी धक्का लागल्यावरून. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. अनेकजण बसमध्ये सीटवर बसलेले आहेत. तर बऱ्याच व्यक्तींना जागा मिळालेली नाही. याच दरम्यान दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होते. ही भांडणे जागेच्या भांडणावरून झालेली आहे. दोन्ही महिला एकमेकींच्या झिंझ्या उपटत जोरदार भांडण करत आहेत. इतर महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या महिलांनी त्यांनी देखील मारायला सुरूवात केली आहे. हा व्हिडिओ बसमदील एका व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे व्हिडिओमधून समजून येते.
हे देखील वाचा- आजीचा नादच खुळा! लावणी डान्सरसोबत धरली जुगलबंदी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w 2 ladies inside bus over some seat issues
pic.twitter.com/nnB2dX6yhU— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 11, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देकील व्हिडिओवर दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नेहमीचेच आहे हे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, बाप रे, हे काय बसमध्ये देखील यांना चेन पडत नाही का? आणकी एका युजरने म्हटले आहे की, मी तर रोज डब्लू डब्लू पाहतो. अशा अनेक प्रतिक्रीया लोकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये केल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, महिलांमध्ये सीटवरून तुफान राडा. मात्र हा व्हिडिओ कोणत्या बसचा आहे हे कळालेले नाही.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.