viral video uncle weird dance in market video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचे माध्यम बनले आहे. कधी काय व्हायरल होईल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा इतके मजेशीर व्हि़डिओ असतात की हसून हसून पोट दुखून येते. सध्या असाच एक मजेशीर अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपले हसू आवरणे कठीण झाले आहे. या व्हिडिओत एक काका वेगळ्याच प्रकारचा डान्स करत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक दागिने आणि मार्केटचा परिसर दिसत आहे. याच वेळी एक काका येतात आणि अचानक डान्स करायला लागतात. ते काही विचित्र पद्धतीनेच डान्स करायला लागतात. काका उड्या मारत विचित्र पद्धतीने डान्स करत असतात. त्याचा हा विचित्र डान्स पाहून आसपासचे लोक मोठ-मोठ्याने हसायला लागतात. तरीही त्या काकांना कोणताही फरक पडत नाही. ते आपले एनटंरटेनमेंट सुरुच ठेवतात.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर gadekar.kaka या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाको लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने फोडणीच्या तेलात जिरे-मोहरी नाचत आहेत असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने काका वायब्रेटमोडवर गेले असे म्हटले आहे. अरेरे काकांना करंट लागला की काय असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. आणखी एकाने काकांचा डान्स पाहून दहशतीचे वातावरण निर्माण जाले असे म्हटले आहे. अनेकांनी व्हिडिओवर हसण्याचे इमोजी आणि स्टीकर्स देखील शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वी देखीस असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कोणी एखाद्या गाण्यावर विचित्र असा डान्स करुन ट्रेंड सेट करत आहेत. कोणी विचित्र असे जुगाड करत असतात. कधी भांडणाचे तर कधी प्राण्यांसबंधित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय स्टंट व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा