VIRAL VIDEO : US man's classical dance on famous Bollywood songNetizens are video goes viral
सोशल मीडियावर रोज नवीन काही ना काही पाहायला मिळते. काही व्हिडिओ इतके भयावह असतात की पाहून थरकाप उडतो. तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते. शिवाय काही असेही व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आपले मन भरत नाही. आपण ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतो. इन्स्टाग्रामवर तर अनेक गाणी ट्रेंडिंगमध्ये असतात. गुलाबी साडी सारख्या अनेक गाण्यांवर जगभरातून डान्स रिल्स बनवले जातता. याशिवाय बॉलीवूडमधील गाणी देखील सध्या जगभरात लोकप्रिय आहेत. बॉलीवूडच्या अनेक गाण्यांवर विदेशी लोक देखील थिरकताना दिसतात. सध्या असाच एक अमेरिकन नागरिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ ॲलेक्स नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर शास्त्रीय नृत्य केले आहे. यामध्ये त्याने २००२ मधील साथिया चित्रपटातील छलका छलका गाण्यावर भरतनाट्यम डान्स केला आहे. तुम्ही हे गाणे अनेकवेळा लग्नांमध्ये ऐकले असले. भारतात हे गाणे लग्नात संगीत कार्यक्रमामध्ये वाजवले जाते. यावर अनेक डान्स व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. याच गाण्यावर ॲलेक्सने भरतनाट्यमचे फ्यूजन केले आहे. या गाण्यावर त्याचे भरतनाट्यमचे स्टेप्स आणि त्याचे हावाभाव अतिशय सुंदर आणि स्पष्ट आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना ॲलेक्सने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “अलीकडे मला भारतीय नृत्य शिकण्याची खूप इच्छा होती. यासाठी मी क्लास शोधला. हा माझा पहिला भरतनाट्यम फ्यूजन चा क्लास आहे. खर तरं मला विशिष्ट, पारंपारिक पद्धतीने हात आणि पायांचे स्टेप्स करणे अवघडं जात आहे. हे अगदी नवीन भाषा शिकण्यासारखे आहे.” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ॲलेक्सने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर @alexdwong शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत ॲलेक्सचे कौतुक केले आहे. त्याने अगदी उत्तम प्रकारे डान्स केला असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना मंत्रमुग्ध करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.