धक्कादायक! गळ्यात सापाला गुंडाळून नाचत होती महिला अन् लाईव्ह स्टेजवरच डसला कोब्रा, Video Viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की अंगावर काटा येतो. तुम्ही सत्य घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा अशा थरारक घटना कॅमेरामध्ये कैद होतात. सध्या असाच एक वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही पाहिले असेल अनकवेळा काही लोक सापांचा खेळ दाखवतात. यामध्ये जीव जाण्याची देखील भिती असते. पण तरीही लोक त्यांचे खेळ दाखवतात. व्हायरल होत असलेला व्हिडीओ असाच काहीसा आहे. एका महिलेला सापासोबत डान्स करणे जीवावर बेतले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून लक्षात घेणे महत्तावाचे आहे की, असे खेळ आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका स्टेटजवर काही कलाकर डान्स करत आहेत. त्याच स्टेजवर एक महिला देखील आहे. तसेच स्टेजवर अनेक सापदेखील दिसत आहेत. तसेच संपूर्ण स्टेज सजवण्यात आले आहे. अचानक महिला डान्स करत असताना खाली पडते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, डान्स करताना साप चावला. तिला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर तिची प्रकृती कशी आहे हे अद्याप कळालेले नाही. तसेच तिला तिथून नेल्यानंतर एक व्यक्ती बिनधास्तपणे हातात साप घेऊन उभा असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
लाइव स्टेज प्रोग्राम के दौरान कोबरा सांप ने कलाकार को डसा , अस्पताल में भर्ती #Snake | #Cobra 🐍 pic.twitter.com/l0A04yhlCe
— arjun yadav (@arjunsaifai2002) November 11, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @arjunsaifai2002 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, यामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत तरीही लोक असेच करतात. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, अलीकडे लोक टॅलेंट दाखवण्याच्या नादात असे धोकादायक काहीतरी करतात आणि जीव गमावून बसतात. हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र अद्याप कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.