फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की अंगावर काटा येतो. तुम्ही सत्य घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा अशा थरारक घटना कॅमेरामध्ये कैद होतात. सध्या असाच एक वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्हाला माहितच असेल दारू पिल्यावर लोकांना काही सुद राहत नाही. अनेकदा दारू पिल्यावर कोण काय करेल सांगता येत नाही. नशेत त्यांना आजूबाजूच्या गोष्टींचे कसलेच भान नसते. अनेकदा हे लोक असे काहीतरी करतात की, इतारांना भिती वाटते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील मद्यधुंद असवस्थेत अशणाऱ्या व्यकतीचा आहे. हा व्हिडिओ उत्तप्रदेशातील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलेले आहे. एका व्यक्तीच्या अंगावर उकळते दुध पडून त्याच्या मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका ठिकाणी एक दुधाचा स्टॉल आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती दारूच्या नशेत बसलेला आहे. तो उढून तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात तरुणाचा दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल जातो. यावेळी उकळते दूध त्याच्या अंगावर पडते. तो तडफडू लागतो. हे दृश्य पाहून तेथील लोक देखील घाबरून जातात. त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. पण त्याचा मृत्यू होतो.
व्हायरल व्हिडिओ
नशे में धुत युवक के ऊपर गिरी गर्म दूध की कढ़ाई, हुई दर्दनाक मौत pic.twitter.com/Ir2oMVVvRv
— Deepak Pandey (@deepakpandeynn) November 10, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @deepakpandeynn शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्याला किती वेदना झाल्या असतील. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दारू पिणे किती वाईट हे या घटनेवरून लक्षात येते. आणखी एका युजरने तरूणांना सल्ला दिला आहे की, दारू पिणे टाळा नाहीतर तुमच्या सोबत देखील असे कहीतरी घडेल. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम करून त्याचा देह नातोवाईकांकडे सोपवला आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.