फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियार रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. दर एक मिनिटाला काही ना काही व्हायरल होताना दिसते. कधी डान्स रिल्स, तर कधी जुगाड, स्टंट. तर कधी भांडणांचे व्हिडिओ पाहायला मिळतात.तसेच तुम्ही अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा थरारक आणणारे व्हिडिओ कॅमेरात कैद होतात. आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होताना दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका बैलाने अचानक एका स्कूटर चालकाला जोरात धडक दिली आणि पुढे स्कूटर चालकासोबत जे काही घडले ते अंगावर काटा आणणारे आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. अनेकद तुम्ही पाहिले असेल की, प्राणी खवळले की, तो कोणावरतरी अचानक हल्ला करतात. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला बैलाला घेऊन रस्त्यावरून जात आहे. तितक्यात अचानक बैल पिसळतो आमि समोरून येणाऱ्या एका स्कूटर चालकाला जोरात टक्कर देतो. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने एक ट्रक जात असतो. बैलाने धडक देताच स्कूटर चालक त्या ट्रक खाली येतो. व्हिडिओ पाहताना अशे वाटते की, त्या माणसाच्या अंगावर ट्रक गेला असेल. पण ट्रक चालक अचानक ब्रेक दाबतो आणि त्या माणसाचे प्राण वाचतात. हा हल्ला काही सेकंदातच घडतो. पण ट्रकचालकाच्या सावधानतेमुळे त्याचे अनेकजण कौतुक करतात.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bangalore_premium या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अशी सावधानता बाळगली पाहिजे गाडी चालवताना, तर दुसऱ्या एका युजरने ट्रक चालकाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी स्कूटर चालाकाला काही झाले नाही ना असा प्रश्न विचारला आहे. मात्र व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या गोष्टीचा मजाक उडवला आहे. जे की चुकीचे असल्याचे अनके नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा- सावधान! रेल्वेमध्ये भेळ खाताय? मग हा व्हिडिओ पाहाच; पुन्हा खाताना 100 वेळा विचार कराल
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.