Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: बाळाला दूध आणायला गेली पण तितक्यात सुरु झाली ट्रेन, डोळ्यातील आक्रोश अन् पुढे काय झालं?

Train Incident Video: आपल्या बाळाला दूध आणण्यासाठी महिला ट्रेनमधून खाली उतरते आणि तितक्यात ट्रेन सुरु होते. आई-मुलाची तुटातूट होईल तेवढ्यात चमत्कार घडतो अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2025 | 10:13 AM
Viral Video: बाळाला दूध आणायला गेली पण तितक्यात सुरु झाली ट्रेन, डोळ्यातील आक्रोश अन् पुढे काय झालं?

Viral Video: बाळाला दूध आणायला गेली पण तितक्यात सुरु झाली ट्रेन, डोळ्यातील आक्रोश अन् पुढे काय झालं?

Follow Us
Close
Follow Us:

व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण, माणुसकीवर आणि मानवतेवर विश्वासाची प्रेरणा देणारे फार कमी व्हिडिओज इथे शेअर केले जातात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आपोपाप स्मितहास्य येईल. हा व्हिडीओ एका आईचा आहे जी आपल्या मुलासाठी दूध आणण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली आणि तितक्यात ट्रेन सुरु झाली. आता आपल्या बाळ ट्रेनमध्ये सुटल्यानंतर पुढे काय झाले ते आपण आज या व्हायरल व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पहिले तर, यात एक महिला रेल्वे रुळावर उभी असल्याचे दिसत आहे. महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. ही महिला आपल्या मुलासाठी दूध किंवा काही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली होती, पण त्याच दरम्यान ट्रेन अचानक सुरु झाली. ट्रेन सुरु होताच महिला घाबरली आणि तिचे डोळे आपोआप पाणावले, आपल्या बाळाच्या विचाराने ती घाबरली.

देव तारी त्याला कोण मारी! दोन भरधाव बसच्या मध्ये येऊन चिरडला, जीव जाणार तितक्यात… पाहून उडेल थरकाप, Video Viral

ट्रेन सुरु झाल्यानंतर ती महिला खाली रुळावर हैराण आणि व्यथित दिसत होती. महिलेच्याही डोळ्यात पाणी आले. आता आपली गाडी चुकली, आपल्या बाळाचे आता काय होणार या विचाराने ती त्रस्त होऊ लागली. पण तितक्यात एक चमत्कार घडतो आणि अचानक ट्रेन थांबते. ट्रेन थांबताच महिला वेगाने ट्रेनच्या दिशेने धाव घेते आणि तिला चढण्याची संधी मिळते. खरंतर, ट्रेन नुकतीच सुरु झाली होती, ती पूर्ण वेगात आली नसल्यामुळे महिलेची असहायता पाहून ट्रेन गार्डने ट्रेन थांबवली असा दावा केला जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक ट्रेन गार्डचे भरभरून कौतुक करत आहेत.

A mother went to buy milk, and the train started. The guard saw and stopped the train.🙏❤️ pic.twitter.com/If8PRMxG5T

— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) January 7, 2025

मृत्यूला कवटाळले! आयुष्याला कंटाळला माकड, थेट विषारी नागाला केले जवळ मग पुढच्याच क्षणी नागाने जे केले… Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एक आई दूध घ्यायला गेली आणि ट्रेन सुरू झाली, गार्डने ट्रेन पाहिली आणि थांबवली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “माणुसकी अजून जिवंत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई ही सर्वात मोठी योद्धा आहे. तिच्या चिकाटी, संयम आणि प्रेमाच्या पातळीशी कोणीही जुळू शकत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman got down to get milk for her child train started moving what happened next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • train viral video

संबंधित बातम्या

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
1

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
2

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
3

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral
4

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.