(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. फोन स्क्रोल करताना, अशा अनेक रिल्स समोर येतात ज्या एकतर चेहऱ्यावर हसू आणतात किंवा आपले होश उडवतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे व्हिडिओज बऱ्याचदा पाहिले असतील. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक विचित्र आणि थक्क करणारा प्रकार वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये नक्कीच तुम्हाला हैराण करून सोडतील. आम्हाला खात्री आहे की अशी दृश्ये तुम्ही मुळातच कुठे पाहिली नसावीत.
काही धोकादायक प्राण्यांच्या यादीत नागाचे नाव अव्वलस्थानी येते. नाग हा एक विषारी प्राणी आहे. त्याच्या एका दंशाने तो मोठमोठ्या बलाढ्यालाही मृत्यूच्या रिंगणात उतरवू शकतो. यामुळेच नागाला फक्त प्राणीच नाही तर माणसंही घाबरून असतात. अशातच आता नागसंबंधीचा एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक माकड विषारी नागाशी खेळताना दिसून येत आहे. ज्या नागाला पाहून दुरूनच लोक पळू लागतात त्याच्या हातात घेऊन माकड आपले माकडचाळे करताना व्हिडिओत दिसून आला आहे. व्हिडिओत नक्की काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊयात.
बापरे! चिमुकल्याला उचलले अन् धाडकन जमिनीवर आपटले, पाहूनच अंगावर काटा येईल, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि आश्चर्य दोन्ही येईल. व्हिडिओत तुम्हाला एका शेतातले दृश्य दिसून येईल, जिथे एक माकड नागसोबत खेळत असतो. मुख्य म्हणजे, नाग बऱ्याचदा माकडाच्या जवळ येण्याच्या प्रयत्न करतो पण तरीही माकड नागाला अजिबात घाबरत नाही आणि पुढच्याच क्षणी त्याला जवळ घेत त्याची माळ बनवत आपल्या मानेवर घेऊन मिरवू लागतो. हा सर्व प्रकार पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. माकडाची ही कृती पाहून आता सर्वजण हैराण झाले आहेत तसेच अनेकांनी हा व्हिडिओची मजा देखील लुटली आहे. विशेष म्हणजे, यावेळी नाग माकडावर अजिबात हल्ला करत नाही जे पाहून अनेक लोक नाग हा माकडाचा मित्र असा अवमान लावत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @egaines1000 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 24 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी कमेंट्स करत माकडाच्या या कृतीवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्याने शत्रूलाही गोंधळात टाकले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय कोब्रा बनणार रे तू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.