Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

Dead Rat In Cold Drink : कोल्डड्रिंक पिताय तर हा व्हिडिओ पाहा. अर्ध ड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला कोल्डड्रिंकच्या कॅनमध्ये आढळला मृत उंदिर. याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 03:50 PM
अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

Follow Us
Follow Us:
  • अर्धे एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर कॅनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचा दावा महिलेने केला.
  • कॅन कापून पाहिल्यावर आत धक्कादायक दृश्य दिसल्याने सोशल मिडियावर खळबळ उडाली.
  • घटनेनंतर पॅकेज्ड ड्रिंक्सच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुम्हीही कॅनबंद कोल्ड्रिंकचे सेवन करत असाल तर सावधान. अलिकडेच यासंबंधित एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांच्याच पायाखालची जमिन हादरवली. महिला आनंदात थंडगार पेयाचा आस्वाद घेते पण हे पेय अर्धे संपल्यानंतर अनोखा ट्विस्ट समोर येतो ज्याने ती हादरुन जाते. सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात महिलेने दावा केला आहे की, ड्रिंक अर्ध संपल्यानंतर तिला समजलं की यात एक मेलेला उंदीर आहे. कोल्ड्रिंक कॅनच्या तळाशी जेव्हा तिने उंदराला मेलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

मुख्य म्हणजे, तिला हे जाणून घेण्यात फार उशीर झाला होता ज्यामुळे ते ड्रिंक तोपर्यंत तिच्या पोटात गेले होते. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेने महिला नाराज झाली आणि तिने याचा व्हिडिओ शूट करुन तिचा अनुभव इंटरनेटवर शेअर केला. चला व्हिडिओत महिलेने नक्की काय म्हटले याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

नक्की काय घडलं?

महिलेने केलेल्या दाव्यानुसार, ती कारमध्ये एनर्जी ड्रिंक पित असताना तिला याच्या आत काहीतरी जड वस्तू असल्याची जाणीव झाली. अर्ध ड्रिंक संपवल्यानंतर तिचा संशय अधिक दृढ झाला आणि तिने घरी येताच कॅनला कापून त्याच्या आत काय आहे ते चेक केले. कॅन उघडताच तिने जे पाहिले त्याने ती पूर्णपणे हादरून गेली कारण त्यात तिला एका लहान उंदीर कोलड्रिंकवर तरंगताना दिसला. उंदीर जिवंत नव्हता पण त्याला पाहताच तिला धक्का बसला आणि ती पूर्णपणे या घटनेने गोंधळून गेली. महिलेने सांगितले की, या घटनेनंतर आता ती कॅनबंद पेय कधीही पिणार आहे. या घटनेमुळे आता कॅनबंद ड्रिंक्सच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

हे लक्षात घ्या की, अन्नात उंदिर आढळणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. उंदराच्या संपर्कात आलेले अन्न जर खाल्ले तर आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे पोटाचा संसर्ग होऊ शकतो. तसेच लेप्टोस्पायरोसिस आणि साल्मोनेलोसिस सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या आजारांमुळे मळमळ, उलट्या, जुलाब, पोटात दुखणे, ताप येणे आणि कावीळ यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

This is insane She drank most of an Alani Nutrition energy drink before discovering a dead mouse at the bottom of the sealed can This has got to be a lawsuit Absolutely disgusting pic.twitter.com/XSOI9weTSO — TONY™ (@TONYxTWO) May 14, 2026

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

महिलेच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवली असून यूजर्सने महिलेच्या दाव्यावर आक्षेप घेत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मी लहान असताना, माझ्या ‘फ्रेस्का’च्या बाटलीत चक्क एक माशी होती. माझ्या आईने त्या कंपनीला फोन केला किंवा पत्र लिहिले; त्यांनी आम्हाला ‘फ्रेस्का’चा एक पूर्ण बॉक्स मोफत मिळवून देणारे कूपन दिले—बस, एवढेच.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छान प्रयत्न केलास बाई! लोकांनी असे प्रकार अनेकदा करून पाहिले आहेत आणि वेंडीजच्या चिली फिंगरवाल्या बाईप्रमाणेच ते नेहमीच पकडले जातात. या बाईवर मानहानी आणि कंपनीच्या महसुलाच्या नुकसानीसाठी खटला दाखल केला पाहिजे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एका मोठ्या कारखान्यात २० हून अधिक वर्षे कोल्डड्रिंक प्रक्रियेच्या देखभालीचे काम केलेल्या व्यक्तीच्या नात्याने मी सांगतो—हे पूर्णपणे खोटे आहे. असे घडणे कोणत्याही प्रकारे शक्यच नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman shocking claim inside canned energy drink dead rat found viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Food Safety
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.