'तांबडी-चांबडी' आता परदेशातही चमकली; तरुणाचा 'असा' डान्स पाहून हसू आवरणार नाही, VIDEO व्हायरल
सोशल मीडिया रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही पाहायला मिळते. कधी स्टंट तर कधी जुगाडाचे व्हिडिओ, कधी भांडणाचे व्हिडिओ तर कधी डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा काही गाणी खूप ट्रेंड करतात. मग त्याच गाण्यांवर अनेकजण व्हिडिओ बनवतात. असेच एक गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमावर ट्रेंड होत आहे. जे सध्या परदेशातही पोहोचले आहे.
तुम्ही पाहिले असेल सध्या मराठी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहेत. गुलाबी साडी, नऊवारी साडी, झापुकझुपूक, अशी अनेक गाणी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेकजण यावर डान्स रिल्स बनवत आहेत. यातील एक गाणे सध्या अनेकांच्या पसंतीस पडले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. विषेश म्हणजे हे गाणे परदेशातही पोहोचले आहे. या गाण्यावर एक तरुणाने अजब डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल.
तरुणाचा झोपून डान्स
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की, एक तरुण रस्त्यावर झोपून तांबडी-चांबडी या गाण्यावर अजब डान्स करत आहे. विशेष म्हणजे तो काही विचित्र पद्धतीने झोपून बाजूला सरकत आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते आहे. तो वेगवेगळ्या स्ट्रीटवर डान्स करत आहे. त्याच्या या डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तरुणाचा हा व्हिडिओ पाहून अनेकजणांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे हा ट्रेंड परदेशात लोकप्रिय झाला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रावरप्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ @kakde_property_mh20 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, गाणं सोडा आधी ते डान्स शिकवा, तर दुसऱ्या एकाने मराठी गाणं वाजलेच पाहिजे अशी प्रतिक्रीया दिली आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाप रे काय डान्स केला, लका लका लका लका. आणखी एकाने अरे त्याला पॅरालिसिस अटॅक आला मधूनच असे म्हटले आहे. तर अनेकांनी व्हिडिओ हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.,
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.