फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात ज्यामुळे संताप येतो. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये काही मुले एका तरुणीची बसमध्ये छेड काढत आहे.
अलीकडे मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडिया, टेलिव्हिजन, वृत्तपत्र यामध्ये मूलींसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटना ऐकल्या की मनात कुठेतरी खंत येते की, अजूनही मुलींवर अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. आजही महिला असुरक्षित आहेत. मुलींवर अत्याचार करणारे खुलेपणाने फिरत आहेत. त्यांना कोणत्याच गोष्टीची भिती नाही. सध्या अशीच एक घटना बसमध्ये घडलेली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी एका तरुणीची छेड काढत आहे. ही मुले निर्लज्जपमाने मुलीली बसमध्ये त्रास देत आहे. एकजण तिच्या मागे उभा राहून तिच्या कमरेवरुन हात फिरवतो. त्याच वेळी ती मुलगी मागे वळून पाहताच तो दुसरीकडे बघतो. तर नंतर दुसरा तरुण तिच्या खांद्यावरून हात फिरतो आणि तिला त्रास देतो. त्या दोघांनी याची कसलीच भिती वाटत नाही. दोन्ही मुले तिच्या मागे उभे राहून तिला त्रास देत असतात. बसमधील इतर प्रवासी देखील काही कर नाहीत. काही वेळाने ही मुले बसच्या मागच्या सीटवर जाऊन बसतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टागर्वार शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना तिथेचे फोडलं पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पहिले ते व्हिडिओ बनवणाऱ्याला हाणा, मुलीला मदत करायची सोडून व्हिडिओ बनवत बसलाय. तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, ताई अगं ठेवून द्यायची होती ना एक. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाण्यावर येणार नाही. चौथ्या एकाने म्हटले आहे की, बाकीचे प्रवासी काय असेच बसले आहेत फक्त त्यांची काही जबाबदारी नाही का, नंतर हीच लोक मुलींनाच वाईट बोलतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.