Viral video young boys performing a terrifying stunt of riding a bike video goes viral
अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: तरुणांमध्ये याचे प्रचंड वेड आहे. भर रस्त्यात स्टंटबाजी करुन लोकांचे लक्ष वेधायचे, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीव धोक्यात घालायचा ही एक परंपरा बनत चालल्या सारखे झाले आहे. अलीकडे अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे. मात्र तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. सध्या असाच एक भयानक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना हादरवून सोडले आहे.
काही तरुण भर रस्त्यात धावत्या बाईकवर स्टंटबाजी करत आहे. याच वेळी या तरुणांमधील एकासोबत असे काहीतरी भयावह घडले की, पाहून अंगावर काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाच तरुण वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सगळे तरुण झोपून बाईक चालवत आहे. चार-ते पाच तरुण वेगाने गाडी चालवत असतानाचा समोरुन एक ट्रक येतो. यातील एका बाईक चालवणाऱ्या तरुणाचा अचानक तोल जातो आणि तो ट्रकला जाऊन धडकतो. तसेच त्याच्या पाठोपाठ असणारी आणखी एक बाईक जोरात ट्रकला धडके. यानंतर तरुणांचे काय झाले याबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु यामुळे तरुणाला नक्कीच गंभीर दुखापत झाली असणार.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @noble_mobile_shopee या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी अशा चुकीच्या आणि धोकायदाक तऱ्हेने बाईक चालवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप काही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. असे अनेक व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रसिद्धीसाठी असे धोकादायक स्टंट करणे, ज्यामुळे आपला जीवही जाऊ शकतो टाळले पाहिजे. यामुळे आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात येतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.