धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट पाहून तरुणी भावूक; VIDEO व्हायरल
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथा, बलिदान, आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. विशेषतः चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यांनी अनेक प्रेक्षकांना भावूक केले आहे. सध्या या संबंधितच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणीचे अश्रू अनावर
सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. चित्रपट पाहून ती अक्षरश: रडू लागल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. चित्रपटाच्या शेवटी संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांचा दु:खद अंत दाखवण्यात आला आहे. या दृश्यांनी तरुणी खूप भावूक झाली. तीला तिच्या भावना अनावर झाल्या आणि ती ढसाढसा रडू लागली. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी देखील भावूक झाले आहेत. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान
संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. 1681 ते 1689 या काळात त्यांनी स्वराज्यासाठी अपार संघर्ष केला. मुघल सम्राट औरंगजेबाला पराभूत करण्यासाठी त्यांनी अनेक युध्द लढली, आणि त्यांच्या निडर नेतृत्वामुळे मुघलांची अवस्था सळो की पळो झाली होती. मात्र, संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या कपटकारस्थानाला ते बळी पडले आणि क्रूर हत्या झाली. त्यांचे बलिदान मात्र भारतीयांसाठी चिरंतन प्रेरणादायी ठरले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोश ल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी तरुणीचे कौतुक केले आहे. अनेकांनी म्हटलं आहे की, “संभाजी महाराजांच्या बलिदानानं आजही आपल्याला प्रेरणा मिळते, हा व्हिडीओ अंगावर काटा आणतो.” तसेच असेही म्हटले आहे की, या चित्रपटामुळे संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण अध्याय नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. या भावनिक होऊन रडणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ हे या चित्रपटाच्या प्रभावीपणाचे एक जिवंत उदाहरण असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.