फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मनोरंजक तर कधी विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट, तसेच भांडणा याशिवाय इतर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. लग्नाच्या संबंधित तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी नवराृनवरीचा डान्स तर कधी घरातील सदस्यांचा डान्स. तसेच लग्नाच्या विविध विधींचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या या संबंधितच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. असे म्हणतात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. यावेळी सुरु असलेल्या विधीमध्ये नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. एक नवीन आयुष्याची सुरूवात होणार असते. मात्र, सध्या याचा एक वेगळाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवरदेव चक्क लुडो खेळतोय…
तुम्ही लग्नातील अनेक मजेशीर, तसेच आनंदाच्या क्षणांचे फोटो पाहिले असती. व्हायरल फोटो देखील असाच आहे. यामध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे की, लग्नाच्या विधी सुरू आहेत. त्याचदरम्यान नवरा मुलाच्या मागच्या बाजूला त्याचे मित्र बसलेले आहेत. ते मोबाईलवर लुडो खेळत आहेत. आणि विशेष म्हणजे नवरा देखील लुडो खेळत आहे. पुढे लग्नाच्या विधी सुरू असताना नवरदेव मात्र गेम खेळण्यात मग्न आहे. सध्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
व्हायरल बातमन्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हारयल व्हिडिओ
Bro has his own priorities pic.twitter.com/CEVJnfPpvb
— Muskan (@Muskan_nnn) November 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेली पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Muskan_nnn या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेली आहे. या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने म्हटले आहे की,काहीही होऊदेत लुडो खेळणे बंद नाही झाले पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ तू इकडे पण हारशील आणि तिकडे पण. आणखी काही युजर्सनी पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.