Viral Video Young Girl dies Due to Heart attack while dancing vidoe goes viral
मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 22 वर्षीय युवतीचा डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. डान्स करताना ती स्टेजवर पडली आणि परत उठलीच नाही. यामुळे कोणाला काय घडले हे लक्षात आले नाही. मात्र, जवळ जाऊन पाहताच ती बेशुद्ध झाल्याचे नातेवाईकांना वाटले. यामुळे तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे म्हटले. यामुसीचे नाव परिणीता जैन असल्याचे सांगण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लग्न समारंभातील संगीताचा कार्यक्रम सुरु आहे. याचवेळी परिणीता स्टेजवर डान्स करत आहे. ती गाणे सुरु होताच डान्स करायला सुरुवात करते. तिचा डान्स पाहून नातेवाईक टाळ्या वाजवू लागतात. पहिले काही मिनिटे ती डान्स करत राहते. परंतु त्यानंतर ती अचानक स्टेजवर खाली पडते. काहीवेळासाठी नेमकं काय घडलं हे कोणाच्याच लक्षात येत नाही. थोड्यावेळाने तिला रुगणालयात नेण्यात येते मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झासल्याचे सांगताच सर्वांनाच धक्का बसतो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगतात. क्षणातं होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
विदिशा में शादी समारोह के दौरान स्टेज पर डांस करते समय 22 वर्षीय परिणीता जैन की अचानक मौत हो गई। उन्हें अस्पताल भी ले जाया गया, जहां डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। हार्ट अटैक से मौत की आशंका जताई गई है।#vidisha #weddingdance pic.twitter.com/pPulKUFan1
— Neeraj Pandey (@gargeyneeraj) February 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
धक्कादायक बाब म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचा आजार नसून तिचा असा आकस्मित मृत्यूने घरातील मंडळींना चांगलाच धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gargeyneeraj या अकाऊंटवर शेअर करुन या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनेकांनी यावर दुख व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.