'व्हॅलेंटाईनला GF वर पैसै उडवण्यापेक्षा...' तरुणाची भन्नाट पाटी व्हायरल, एकदा पहाच काय लिहलंय, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु असून यासंबंधित प्रेमी युगलांचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेमी लोक आपले प्रेम सेलिब्रेट करत असून एकमेकांना छान फुल, पुष्पगुच्छ, चॉकलेट, टेडी, महागाड्या वस्तू गिफ्टमध्ये देत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालण्यासाठी हा आठवडा साजरा करत आहेत. याच दरम्यान या संदर्भात एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने गुंतवणुकीचा, पैसै वाचवण्याचा भन्नाट असा सल्ला लोकांना दिला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हातात पाटी घेऊन रसत्यावर उभा आहे. अनेकजण या तरुणाकडे वळूण वळूण पाहात आहेत. त्याच्या हातात असलेली पाटी लिहल्यावर अनेकांना हसू फुटले आहे. या तरुणाने व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर पाटीवर एक संदेश लिहिला आहे. त्यांने व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ला गिफ्ट देऊन पैसै उडवण्यापेक्षा गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने पाटीवर लिहिले आहे की, “व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यापेक्षा SIP सुरू करा, धोका नाही. निदान व्याज तरी खाल.” असे लिहिले आहे. त्याची ही पाटी पाहून अनेकांनी त्याला समर्थने केले आहे तर काहींना यावर हसू फुटले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_sahil_0919 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला काही सेकंदातच लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मागच्या फेब्रुवारीपासूनच सुरु केले आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने उद्यापासूनच चालू करतो असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजूनही वेळ गेलेली नाही. सुधरा पोरांनो असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.