viral video young girls beaten two boys who harassing them video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या होळीनिमित्त अनेक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये काही तरुणींना त्यांची छेड काढणाऱ्या तरुणांना चांगलाच चोप दिला आहे. ही घटना हरियाणाच्या सोनीपत येथे घडल्याची माहिती मिळाली आहे. धुलवडीच्या दिवशी काही रोड-रोमियोंनी तरुणांची छेड काढली. मात्र या तरुणांना पोरींनी चांगला सबक दिला आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुणी घराबाहेर होळीचा आनंद घेताना दिसत आहेत. याच वेळी दोन तरुण त्यांच्यावर हसतात आणि काहीतरी घाणरेडी कमेंट पास करतात. यामुळे तरुणी रागात येऊन त्या तरुणांना मारायला लागतात. स्वत:च्या बचावासाठी तरुण देखील त्या तरुणींना मारतात. तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरुण दोन्ही तरुणांना हाणून पाडून बेदम मारतात. अगदी तरुणांच्या डोक्यात बादलीही घालतात. हा सर्व प्रकार तेथीलच एका घरातून रेकॉर्ड करण्यात आला आहे.
अलीकडे मुलींच्या छेड काढण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होळीच्या दिवशी तर अशा अनेक घटना घडतात. रंग लावायच्या बहाण्याने मुलींना, महिलांना त्रास देणे, त्यांच्यावर कमेंट पास करणे, त्यांना जबरदस्तीने रंग लावणे हे सर्व प्रकार घडता. अनेकदा अशा घटनांमध्ये मुलींचे लैगिंक शोषणाच्या देखील घटना घडतात. यामुळे प्रत्येक मुलीने जागच्या जागी छेड काढणाऱ्यांना चोप दिलाच पाहिजे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @parulgscl3 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. एका युजरने बदमाश्यांना असाच सबक मिळायला पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने भाऊ, म्हारी छोरिया छोरोंसे कम है के असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने काय चाललंय काय, रोज अशी घटना पाहायला मिळत आहेत. सुरक्षा प्रशासन आणि पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.